
ठाणे (31) – ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025-26 करिता मा. राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून पी. वेलरासू (भा.प्र.से), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांची नेमणूक केली आहे. तर श्रीमती समीक्षा चंद्राकर, अध्यक्ष, जात पडताळणी,जिल्हा सिंधुदुर्ग यांची ‘निवडणूक निरीक्षक’ म्हणून नेमणूक केली आहे. हे दोन्ही निरीक्षक 30 डिसेंबर 2025 रोजी ठाणे शहरात दाखल झाले आहेत.
पी. वेलरासू यांचा 9869552142 हा भ्रमणध्वनी क्रमांक असून यांचे समन्वयक म्हणून सुधीर गायकवाड, उपअभियंता, ठाणे महानगरपालिका यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7039197131 हा आहे.
समीक्षा चंद्राकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक हा 9822186477 असून यांचे समन्वयक म्हणून प्रतिक पाटील, उपअभियंता, ठाणे महानगरपालिका यांची नेमणूक करण्यात आली असून (भ्रमणध्वनी क्रमांक 9892845821) असा आहे.
: महाराष्ट्र माझा न्यूज
www.MaharashtraMajhaNews.com