
ठाणे (दि.07 ) : ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रात बेवारस स्थितीत आढळलेली 30 वाहने ठाणेनगर वाहतूक उपविभाग कार्यालयाच्या आवारात पडून आहेत. (वाहनांची यादी सोबत जोडली आहे)
यादीत नमूद वाहनांचे मूळ मालकांचा आर.टी.ओ मध्ये उपलब्ध असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवून शोध घेण्यात आला. परंतू या वाहनांच्या मालकीचा दावा करण्यासाठी कोणीही ठाणेनगर वाहतूक उपविभाग कार्यालय येथे आलेले नाहीत.
या वाहनांची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. ही वाहने ज्या व्यक्तींच्या मालकीची असतील त्यांनी मोटार वाहनासंबंधी मूळ कागदपत्रांसह दि.10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत ठाणेनगर वाहतूक उपविभाग ठाणे येथे समक्ष हजर राहावे, अन्यथा या मोटार वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार यांनी केले आहे.

