
ठाणे (दि.7) – ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम.बी.आर. येथे मुख्यजलवाहिनीस गळती होत असून गळती बंद करणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी बुधवार दिनांक 9/4/2025 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत शटडाऊन घेऊन सदरची कामे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 12 तासाचा शटडाऊन घेवून तातडीची कामे हाती घेणार आहे.
परिणामी बुधवार दि. 9/4/2025 रोजी सकाळी 9:00ते रात्री 9:00 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवाचा काही भाग इत्यादी भागात 12 तासांसाठी पुर्णपणे पाणी पुरवठा बंद राहील.
ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ