
ठाणे (ता.7) चैत्र नवरात्र उत्सवात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सपत्नीत नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग मध्ये सहभाग घेऊन राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याची मागणी देवीकडे केली. यावेळी श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदीसह अनेक मान्यवर नेते आवर्जुन उपस्थित होते. दरम्यान, रविवारी रामनवमी असल्याने देवीच्या जागरातही रामनामाचा जल्लोष सुरू होता.
ठाणे, पुर्व, कोपरी, येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सव साजरा केला जातो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच, नऊ दिवस त्यांच्या कुटुंबीयांनी श्रीं ची प्राणप्रतिष्ठा, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले.
स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून प्रतीवर्षीचा शिरस्ता पार पाडला. त्यानंतर उभयतांनी 108 प्रदक्षिणा घालुन श्री मॉ अंबेची आराधना केली. याप्रसंगी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, जयप्रकाश कोटवानी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.






