
ठाणे (03) : मतदानाचा टक्का वाढावा किंबहुना जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून कळवा विभागात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
आयुक्त तथा निवडणुक अधिकारी सौरभ राव यांच्या सूचनेनुसार स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ.मिताली संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. कळवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र. 24 मधील वाघोबा नगर, दुर्गादेवी परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यातून नागरिकांना 15 जानेवारी 2026 रोजी मतदान असून या दिवशी प्रत्येकाने आपला हक्क बजावावा असा संदेश देण्यात आला. या पथनाट्यात सरस्वती शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. तसेच पथनाट्य सादरीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक उपस्थित होती. यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली, यावेळी नागरिकांनी देखील मतदान करण्याचा निर्धार केला.
कळवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र. 25 मध्ये घोलाई नगर, मार्केट परिसरात स्विप पथकामार्फत “पथनाट्य ” सादरीकरण करून मतदानविषयीं जनजागृती करण्यात आली. सादरीकरणावेळी स्विप पथकातिल सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच ठा. म. पा. शाळेतील मधील शिक्षक, विद्यार्धी यांनी सहभाग घेतला. पथनाट्य सादरीकरणवेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रभाग क्र. 23 मध्ये कळवा नाका परिसरात मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो.., आपले मत आपला अधिकार अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच पथनाट्यातून नागरिकांना मतदान करण्याबाबत प्रवृत्त करणारा संदेश देण्यात आला.
कळवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र. 09 मध्ये खारेगाव परिसरात स्विप पथकामार्फत “पथनाट्य ” सादरीकरण करून मतदानविषयीं जनजागृती करणारे संदेश नागरिकांना देण्यात आले. लोकशाहीने दिलेला अधिकार हा आपला हक्क असून तो प्रत्येकाने बजावावा. दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.