
परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन
ठाणे (5 जानेवारी 2026) : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन करत आहे, याचा मला आनंद आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ओवळा माजिवडा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनांची मी पूर्तता करू शकलो. याबद्दल शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो.
आपले दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यांचे अभिनंदन. ओवळा माजिवडा मतदारसंघासह ठाण्यात महायुतीचे सर्व उमेदवार येत्या 16 जानेवारीला विजयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर फडकवला जाईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
आपल्या मतदारसंघात 80 ते 90 टक्के विकास कामं पूर्णत्वास नेली आहे. ठाणे मेट्रो, क्लस्टर डेव्हलपमेंट, स्व. इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय, वाघबीळ चौपाटी, वाघबीळ येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब कलादालन, भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल, जलतरण तलाव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र, धर्मवीर आनंद दिघे साहेब जिमखाना व क्रीडासंकुल , विविध समाजभवनं, पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमि अशा विविध प्रकल्पांतून ‘विकासाचं ठाणे, भविष्याचं ठाणे’ आकार घेत आहे. ही केवळ वचनपूर्ती नाही तर माय बाप जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे.
यावेळी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पुर्वेश सरनाईक, प्रभाग क्रमांक 1 साजन कासार, प्रभाग क्र. 4 राकेश मोदी, प्रभाग क्र. 5 संदीप नटे, गणेश टाक, प्रभाग क्र. 6, संतोष ढमाले, प्रभाग क्र. 7, भगवान देवकते, प्रभाग क्र. 8′ विरेंद्र पंडित, प्रभाग क्र. 14, विराज निकम आणि पदाधिकारी उपस्थित होते.
: महाराष्ट्र माझा न्युज