
ठाणे (24) : उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. दिनांक 19 ते 24 जून पर्यत एकूण 73 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यात पूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम याप्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. यापुढेही अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समिती निहाय कारवाई सुरूच राहणार आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तळ मजला अधिक चार मजले, सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडावून, व्याप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम, प्लिंथ, दुकानातील वाढीव बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारींनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 19 आणि 20 जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण 33 अनधिकृत बांधकामांवर तर 21 आणि 23 जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण 30 अनधिकृत बांधकामांवर तर आज 24 जून रोजी 10अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.दिवा येथील सर्व्हे क्रमांक 178, 179, 180 या ठिकाणच्या दोन इमारती पूर्णपणे निष्कसित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली.

या कारवाईमध्ये उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले.
■ अनधिकृत बांधकामावर दिनांक 19 ते 24 जून पर्यत करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी (एकूण 73)
● नौपाडा- कोपरी – 06
● वागळे – 04
● लोकमान्य सावरकरनगर – 06
● वर्तकनगर – 05
● माजिवडा मानपाडा – 13
● उथळसर – 03
● कळवा – 06
● मुंब्रा – 07
● दिवा – 23
: ठाणे रेडिओ
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJune 30, 2025हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द
ताज्या बातम्याJune 28, 2025शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
ताज्या बातम्याJune 28, 2025मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या स्पेस एज्युकेशन लॅब’ ची निर्मितीठाण्यात’ होणार
ताज्या बातम्याJune 27, 2025घोडबंदर रोडवरील सिग्लनपाशी रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार