
ठाणे (दि.26) : परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करणेबाबत सूचित केले आहे. त्याकरिता परिवहन विभागाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD., एजन्सीची नियुक्ती केली असून HSRP बुकिंग पोर्टल लिंक/URL https://hsrpmhzone2.in आहे. या लिंकवर वाहनांसंबधित आवश्यक सर्व माहिती अचूक भरावी जेणेकरुन कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) साठी लागणारे शुल्क आणि लागणारा वेळ/दिवस निर्धारित केले आहेत.
शुल्क पुढीलप्रमाणे:-
Two-Wheelers and Tractors – HSRP Set Rates including fitment charges excluding GST (in INR) – 450.00.
Three-Wheelers – HSRP Set Rates including fitment charges excluding GST (in INR) – 500.00.
Light Motor Vehicles/Passenger Cars/ Medium Commercial Vehicle/Heavy Commercial Vehicles and Trailer/Combination – HSRP Set Rates including fitment charges excluding GST (in INR) – 745.00.
वेळ/दिवस कालावधी खालीलप्रमाणे:-
HSRP Appointment Booked by Applicant – Timeline – Day 0
Blank HSRP to be embossed – Timeline – 2 day prior to appointment Date.
Applicant to be able to reschedule appointment, if HSRP not affixed in the first appointment-Any date – Timeline – up to 90 days after first appointment date.
Embossed HSRP to be maintained at Affixation Centre – Timeline – Up to 90 days after first appointment.
Embossed HSRP to be destroyed – Timeline – After 90 days from first appointment date (if not fitted to respective vehicle).
यापूर्वी परिवहन विभागाच्या सूचनेनुसार हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) दि.31 मार्च 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.