|February 14, 2024

तात्परुते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी ठाणे महापालिकेने निश्चित केल्या २०४ जागा

 

ठाणे (१4) : ठाणे महापालिmedका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय, तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, तात्परुते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी एकूण २०४ जागा ठरविण्यात आल्या आहेत. महापालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडे भरल्यावर या जागांवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर, बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे.

नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्र. याचिका -३०१७/ प्र. क्र. १३०/ नवि-२२ दि. १४.१०.२०२२च्या नुसार महापालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महानगरपालिकेने होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्चित केल्या. त्यासाठी पोर्टल तयार केले आणि या प्रकारच्या जाहिरातींवर लावण्यासाठी क्यू आर कोड उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली असल्याची माहिती उपायुक्त (जाहिरात) महेश सागर यांनी दिली. ही एक खिडकी योजना असून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीनेच ही परवानगी दिली जाणार आहे, असेही महेश सागर यांनी स्पष्ट केले. अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग, जाहिरात विभाग आणि सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रभाग समितीनिहाय तात्पुरते फलक लावण्यासाठी जागा निश्चित केल्या. त्यात माजिवडा-मानपाडा (५२), लोकमान्य नगर- सावरकर नगर (१९), वर्तकनगर (०६), कळवा (०५), वागळे (१९), मुंब्रा (५), उथळसर (१५), दिवा (४०), नौपाडा (२२), कोपरी (२१) अशा एकूण २०४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

तात्पुरत्या जाहिरातींसाठी ८ बाय ६, ८ बाय ३ आणि ६ बाय ३ असे तीन प्रकार निर्धारित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रती दिन, प्रती चौ. फूट १०० रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. या जाहिरातींसाठी परवानगी घेण्यासाठी https://tmc.advertisepermission.in/या वेब पोर्टलवर अर्ज करता येईल. त्यात आवश्यक त्या जागा, फलकाचा आकार ही माहिती भरल्यानंतर किती भाडे भरावे लागेल याची माहिती येईल. त्यानुसार, ऑनलाईन भाडे भरल्यावर क्यू आर कोड तयार होईल. हा क्यू आर कोड तात्पुरत्या जाहिरातींवर लावणे बंधनकारक असल्याचे उपायुक्त महेश सागर यांनी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स यांना आळा घालण्यासाठी ही परवानगीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन उपायुक्त महेश सागर यांनी केले आहे.

ऑनलाईन परवानगीसाठी महापालिकेचे https://tmc.advertisepermission.in/ वेब पोर्टल तयार ; प्रती दिन, प्रती चौ. फूट १०० रुपयांप्रमाणे होणार भाडे आकारणी

Developed By IWEBSENSE
अपडेट :
# ➤ News Update : ठाणे महानगरपालिकेच्या ग्रंथ दिंडीला उत्साही प्रतिसाद महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजन; महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहातील प्रदर्शन व पुस्तक विक्री ही नागरिकांसाठी खुली आहे. मंगळवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. त्यात, प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील दुर्मिळ आणि जुनी पुस्तके पाहता येतील. तसेच, त्यांच्यासह साहित्य अकादमी, मॅजेस्टिक बुक डेपो आणि वयम मासिक यांच्या स्टॉलवर पुस्तकांची खरेदीही करता येईल.➤ Information| ठाणे शहर आणि कळवा, मुंब्रा येथील काही भागात गुरूवारी पाणी नाही तातडीच्या दुरुस्तीसाठी 12 तासांचा शटडाऊन ➤ Information| ठाणे रेडिओवर 24x7 शहरातील अपडेट्स, मनोरंजनाचा आस्वाद घेणं आता शक्य ! www.thaneradio.com या वेबसाईटवर ऐकता व पाहता देखील येणार | Email Id : thaneradio@gmail.com & Contact Number 9930608000