
ठाणे,दि. 16 :- मौलाना अब्दूल कलाम आझाद स्टेडियम, कौसा, मुंब्रा, ठाणे येथे दि.29 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील नव युवकांकरिता सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती मेळाव्यासाठी विविध प्रकारचे तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्याची आवश्यकता असल्याने ते उपलब्ध करुन देणाऱ्या कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येत आहेत. तसेच इच्छुक कंत्राटदारांकडून या कार्यालयास निविदा प्राप्त होण्याची अंतिम दि.01 जानेवारी 2026 आहे.
याबबात इच्छुक कंत्राटदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे दूरध्वनी क्र.022-45641593/9920016580 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे/पालघर यांनी केले आहे.