
ठाणे (16) : एखादी आपत्ती उद्भवल्यास त्याचा सामना कसा करावा किंबहुना आपत्ती व्यवस्थापनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आज ठाणे शहरातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास महापालिकेच्या शाळा क्र. 23 मधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पर्यावरण विभागाच्या संयुक्त् विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखालील ठामपा शाळा क्र. 23 मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, गटअधिकारी संगीता बामणे, गटप्रमुख रवींद्र पाटील, मुख्याध्यापक दीपक मोरणकर आदी उपस्थित होते.
पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करावा, स्वच्छता ची काळजी घ्यावी. झाडे लावणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी आपत्ती म्हणजे काय? आपत्तीचे कोणते प्रकार आहेत, आपत्तीच्या काळात काय करावे, आपत्ती मध्ये स्वतः चा आणि आपल्या घरच्या लोकांचा जीव कसा वाचवावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले. यावेळी माझी वसुंधरा बाबत विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केली.
यावेळी विद्यार्थ्यांकरिता “आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली.सदर चित्रकला स्पर्धेत एकूण २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
त्याचप्रमाणे मंगळवार दि. १६.१२.२०२५ रोजी आपत्ती व्यवस्थापन विभाग व पर्यावरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कौसा येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र. १२५ मधील विद्यार्थ्यांकरिता “आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.