
ठाणे (16) : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून पर्यावरण विषयक विविध स्पर्धा ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ अंतर्गत ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन, शालेय, सामाजिक संस्था यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रतिसाद द्यावा व माझी वसुंधरा अभियान ६.० यशस्वी करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
स्वयंसेवी संस्था, NGO, महाविद्यालय, ठामपा शाळा, खाजगी शाळांसाठी पर्यावरण संदर्भात रिल्स/माहितीपट बनविणे, पर्यावरण दुतांची निवड करून पर्यावरणभिमुख जनजागृती उपक्रम राबविणे, हरित शपथांची नोंदणी करून व हरित कृती करून समाजमाध्यमांवर प्रसिद्धी करणे हि स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सामाजिक/शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी होता येईल. त्याकरिता ठामपाद्वारे Google Form तयार करून त्याच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. सदर नोंदणीची लिंक ठाणे महानगपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेमुळे ठामपा क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरीक, सामजिक संस्थेचे कार्यकर्ते, विद्यार्थ्यांपर्यंत माझी वसुंधरा अभियानाची माहिती पोहचण्यास मदत होणार असून विविध पर्यावरणीय विषयांवर जनजागृती होणार आहे.