अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर ‘विश्वामित्र’ या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझ्याविना’ असे ह्या गाण्याचे बोल असून, तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणाऱ्या ह्या गाण्यातून प्रेमाची आणखी एक कथा पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा आपल्याला येत्या २ फेब्रुवारीला समजणार आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.