
ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे व टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन मधील आवश्यक कामे करणे, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन करणे व इतर आवश्यक कामे बुधवार दि.15/10/2025 रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बुधवार दि.15/10/2025 रोजी सकाळी 9:00 वा रात्री 9:00 वा पर्यंत 12 तासाचा स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. या दिवशी मे.स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरु ठेवण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने बुधवार दि.15/10/2025 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समतानगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, व कळव्याचा काही भागात 12 तासांसाठी पुर्णपणे पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
वरील शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.