
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील बहुप्रतीक्षित मालिका ‘आमी डाकिनी’ प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी एक वेधक कथानक घेऊन येत आहे. आहट सारख्या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेनंतर आता ही वाहिनी कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवरील ही मालिका सादर करत आहे. या मालिकेत हितेश भारद्वाज अयानच्या भूमिकेत, शीन दास डाकिनीच्या भूमिकेत तर राची शर्मा मीराच्या भूमिकेत दिसणार आहे.
मीरा ही व्यक्तिरेखा साकारत असलेली राची शर्मा आपल्या या भूमिकेसाठी आपण स्त्री चित्रपटातील श्रद्धा कपूरच्या परफॉर्मन्समधून कशी प्रेरणा घेतली हे सांगते. ती म्हणते, “मी जेव्हा स्त्री चित्रपटात श्रद्धाचा अभिनय पाहिला, तेव्हा मला तो खूप आकर्षक वाटला होता. तिच्यात काही तरी गूढ असे आकर्षण होते. आणि त्यासोबत एक मूक, भावनिक ओढ देखील होती. तो परफॉर्मन्स माझ्या लक्षात राहिला. मीराची भूमिका मला मिळाली, तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा गाभा मी उचलू शकत होते, पण त्यांची भावनात्मक पार्श्वभूमी वेगळी असल्याचे माझ्या लक्षात आले. श्रद्धाचे हावभाव, तिचे मौन आणि तिची लय प्रेरणादायक होती. पण मीरासाठी वेगळ्याच उत्कटतेची गरज होती. तिच्या संयमातून आणि शांततेतून मी प्रेरणा घेतली पण त्याचा उपयोग मी अधिक बोल्ड, आणि रोखठोक व्यक्ती साकार करण्यासाठी केला. त्यामुळे, होय मी नक्कीच श्रद्धाच्या भूमिकेचा उपयोग सुरुवातीचा संदर्भ म्हणून केला, पण त्यातून पुढे मला मीराचा शोध स्वतंत्रपणे घ्यावा लागला.”
बघा, ‘आमी डाकिनी’ 23 जून पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJune 30, 2025हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द
ताज्या बातम्याJune 28, 2025शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
ताज्या बातम्याJune 28, 2025मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या स्पेस एज्युकेशन लॅब’ ची निर्मितीठाण्यात’ होणार
ताज्या बातम्याJune 27, 2025घोडबंदर रोडवरील सिग्लनपाशी रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार