ठाणे : मानपाडा येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 7 येथे महानगरपालिकेतील दहावीच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.. त्यांना मार्गदर्शन केले तसेच जे परीक्षेत टॉपर होतील अशा शाळेतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व विशेष पारितोषिक देण्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमाला ठाणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी, पंढरीनाथ पवार, ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साळुंखे, शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. मागील वर्षी ही आ. केळकर यांनी 10 वी च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून टॉपर आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता.