
ठाणे ( दि. 27 डिसेंबर ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासह भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राम शिंदे, जनसंपर्क प्रमुख राज ठाकूर, मनसेचे जिल्हा सचिव ॲड. शैलेंद्र करले, भिवंडीचे मनसे विभाग अध्यक्ष शिनाथ भैरी, अनिल पवार, राजू प्रेस्थान तसेच ठाणे जिल्हा प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीचे जिल्हा सचिव कुणाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम पाटील आणि यश शिंदे, हनुमंत भुरके, तसेच मानवता सेवा संघाचे पदाधिकारी शिव वाघेरा, प्रतीक्षा वाघेरा, प्रियांका वाघेरा, हर्षल वाघेरा, अनिता जाधव, सरिता चारु, प्रतिभा चित्ते, शरद शिंदे यांनीही यावेळी हाती भगवा धरत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.