
प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी प्रशिक्षण मोलाचे ; मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

ठाणे “क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम” या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद, ठाणे च्या सामान्य प्रशासन विभाग आयोजित नवनियुक्त कर्मचारी यांचे आस्थापना व आदी विषयांबाबत पायाभूत प्रशिक्षण शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता, बी.जे. हायस्कुल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे म्हणाले की, ” जिल्हा परिषदेत नवनियुक्त अधिकारी- कर्मचारी यांना शासकीय कामकाज उत्तमरित्या करता यावे, यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आला आहे. सर्व नवनियुक्त जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी आजच्या प्रशिक्षणात शासकीय कामकाजाचे स्वरूप समजून घ्यावे. येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी हे प्रशिक्षण मोलाचे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थींना कामकाज उत्तम करण्यासाठी मदत होईल. तसेच इतर विषयाचे व येणाऱ्या अडचणींवर वेळत मात करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पुढील काळात देखील नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येईल. कार्यालयातील प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे”
प्रास्ताविक करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी नवनियुक्त, अनुकंपा तत्त्वावर नवनियुक्त तसेच जिल्हा बदलीने जिल्हा परिषदेच्या सेवेत रूजू झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी माहिती अधिकार, रजा नियम, टिप्पणी, पत्रलेखन, शिस्त व अपिल, इ-ऑफिस, मानसिक स्वास्थ व्यवस्थापन, GEM, कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज वेगाने करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवणे, विस्तार अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) वैभव वायकर प्रशिक्षक तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी माहिती अधिकार, सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी शुभांगी रावत यांनी रजा नियम, टिप्पणी, पत्रलेखन, शिस्त व अपिल, जिल्हा समन्वयक, इ-ऑफिस,रायगड कृष्णा उथळे यांनी ई-ऑफिस, महाराष्ट्र मेंटल हेल्थ संस्था,पुणे रेश्मा कचरे यांनी मानसिक स्वास्थ व्यवस्थापन, GEM, मास्टर ट्रेनर, अहिल्यानगर अशेक कडनर यांनी GEM Portal, जिल्हा परिषदेचे तंत्रज्ञान सहा./सल्लागार शुभांगी देसाई यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) यांनी संदर्भांत सविस्तर मार्गदर्शन केले.
अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लेखा), बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक निम्न श्रेणी, पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक, शिक्षण (प्राथमिक) विभागातील विस्तार अधिकारी (शिक्षण), ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), आरोग्य पर्यवेक्षक तर ग्रामपंचायत विभागातल ग्रामसेवक असे एकूण 165 अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ठाणे रेडिओ