
ठाणे (22) : सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर गोखले रोड वरून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोखले रोड वरील ही जाळी 100 फूट लांब, 25 फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून 20 फूट एवढी आहे. या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. आणखी काही ठिकाणी अशाप्रकारे जाळी उभारण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे
: ठाणे रेडिओ
Related posts:
Please Share and like us: