
७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तलावपळी येथील शिवसेना शाखेत ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित राहून हा गौरवशाली क्षण अनुभवला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट या १११ गोविंदांच्या संघाने अद्भुत मानवी मनोरे रचून भारतीय राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
भारत-स्पेन सांस्कृतिक आदानप्रदानाचा हा अद्वितीय क्षण सर्वांना अनुभवण्यास मिळाला.
आपली परंपरा, आपला उत्साह… आणि स्पेनच्या खेळाडूंची शिस्त, मेहनत व एकजुटीचे दर्शन हे खरोखर प्रेरणादायी आहे.

Please Share and like us: