
ठाणे – ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ तर्फे “उगम’ अंतर्गत पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांचे टाउन हॉल येथे 29 जून रोजी बासरी वादन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती गुरुकुल प्रतिष्ठान च्या वतीने विवेक सोनार यांनी दिली आहे.
ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. दीड दशकाहून अधिक काळ संस्थेतर्फे बासरीचे अनेक विद्यार्थी गुरुकुल परंपरेत तयार होऊन आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत. सुविख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्या प्रयत्नांतून संस्थेतर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम होत असतात.
गुरुकुल प्रतिष्ठान आणि यूनियन बँक ऑफ इंडिया तर्फे ‘उगम’ या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 29 जून 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता, टाउन हॉल, कोर्टनाका, ठाणे येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमाची तरुण गायिका सावनी परेकर चे शास्त्रीय गायनाने सुरुवात होणार असून त्यांना अमेय गांधी हार्मोनियम तर अथर्व आठल्ये तबल्यावर संगत करणार आहे. पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांचे बासरीवादन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यांना तबल्यावर समीर सूर्यवंशी संगत करणार आहे.
पंडित रोणू मजुमदार हे रसिक आणि संगीताच्या साधकां सोबत संवाद देखील साधणार आहेत.
सदर कार्यक्रमात ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे व या कार्यक्रमाचा रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठान च्या वतीने विवेक सोनार यांनी केले आहे.