
ठाणे जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट-क (वर्ग 3) व गट-ड (वर्ग 4) संवर्गातील कर्मचाऱ्यांची जिल्हांतर्गत प्रशासकीय, विनंती व आपसी बदली प्रक्रिया या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या सहभागाबरोबरच पारदर्शक निर्णयप्रक्रियेवर भर देण्यात आला. समुपदेशनाच्या माध्यमातून १५ मे, २०२५ रोजी, बी. जे. हायस्कुल येथे यशस्वीरित्या पार पडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या उपस्थितीत बी. जे. हायस्कूल सभागृह, ठाणे येथे बदली प्रक्रिया पार पडली. बदली प्रक्रियेची संपूर्ण कार्यवाही पारदर्शकतेच्या निकषानुसार राबवण्यात आली असून, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक व यूट्यूबवर Live Streaming द्वारे नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्यात आली होती.
बदली प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये विभागली गेली होती. यात आदिवासी व बिगर आदिवासी भागातील प्रशासकीय प्राधान्य, सेवा कालावधी व वास्तव्य जेष्ठतेनुसार समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर विनंती व आपसी बदल्याही समुपदेशनाद्वारे पूर्ण करण्यात आल्या.
१५ मे रोजी ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, अर्थ, सामान्य प्रशासन व प्राथमिक शिक्षण विभागांतील बदल्या पार पडल्या, तर दि. १६ मे रोजी ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी व बांधकाम विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे.

अर्थ विभाग, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रशासकिय व विनंती बदलीस पात्र कर्मचारी नसल्याने त्या विभागातील बदली करण्यात आली नाही. महिला व बालकल्याण विभागातील प्रशासकीय ०१, विनंती ०० बदल्या करण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागातील प्रशासकीय ०६, विनंती ०२ बदल्या करण्यात आल्या., सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रशासकीय ०३, कनिष्ठ सहाय्यक प्रशासकीय ०७, वरिष्ठ सहाय्यक विनंती ०२, कनिष्ठ सहाय्यक विनंती ०१, कनिष्ठ सहाय्यक आपसी ०३ (६) बदल्या करण्यात आल्या व प्राथमिक शिक्षण विभागांतील प्रशासकीय ००, विनंती ०१ बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुख, अधिकारी, तांत्रिक पथक व कर्मचारी यांचे योग्य समन्वय व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. बदल्यांनंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी नवीन कार्यस्थळी तत्काळ रुजू व्हावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.