
ठाणे दि.15 : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या 23 जानेवारी 2025 रोजीच्या बैठकीमध्ये मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सी.एन.जी.) व ऑटोरिक्षा (सी.एन.जी.) यांच्या भाडेदर वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित भाडेवाढीप्रमाणे अद्यापही मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षा वाहनांचे भाडेमीटर रिकॅलीब्रेशनचे काम बाकी असल्याने टॅक्सी/ऑटोरिक्षा भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करण्याकरिता दि.31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या 30 एप्रिल 2025 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
मुदतवाढ समाप्ती नंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी विभागीय दंडात्मक शुल्क प्रतिदिन रुपये 50/- आकारण्याचा निर्णय .01 जून 2025 पासून लागू होईल, याची सर्व मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षा चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी केले आहे.