
स्त्रीशक्तीचे प्रखर आणि प्रभावी दर्शन घडवणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा स्त्रीप्रधान चित्रपट असल्याचे कळतेय.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी झळकत असून तिच्या नजरेतील तीव्र क्रोध आणि आत्मविश्वासू लूकने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात,” ‘वामा’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाचा विषय खूप महत्त्वपूर्ण असून तो आजच्या स्त्रियांसाठी गरजेचा आहे.
आज समाजात स्त्रीला दिला जाणारा सन्मान केवळ शब्दांपुरताच सीमित राहिलाय, प्रत्यक्षात अजूनही तिच्यावर अन्याय होतोच आहे. ‘वामा’ या चित्रपटातून मी ही वास्तविकता थेट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन म्हणून नाही तर विचारांच्या पातळीवरही हा चित्रपट अनुभवावा, हीच माझी अपेक्षा आहे.”
चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात,” ‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट फक्त एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नाही, तर समाजाच्या मानसिकतेविरुद्ध चाललेली ही एक जोरदार लढाई आहे. आजच्या काळातही अनेक महिला आपल्या अधिकारांसाठी, सन्मानासाठी झगडत आहेत. ‘वामा’मधून आम्ही त्याच लढ्याला आवाज दिला आहे. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट रसिकांना नक्की आवडेल”.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक
ताज्या बातम्याJuly 1, 2025ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खत निर्मिती सुरू
ताज्या बातम्याJuly 1, 2025हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित