
मुंब्रा-कौसा येथील चांद नगर परिसरातील मुझाम्मील टॉवर मध्ये अनधिकृतपणे इमारतीला तसेच तेथील रहिवाशाना वीज पुरवठा केल्याप्रकरणी टोरंट पॉवर कंपनीतर्फे सदर इमारतीचा बिल्डर विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वीज अधिनियम २००३ ते कलम १३५ नुसार हा गुन्हा पोलिसात नोंदवण्यात आला आहे.
टोरंट पॉवर कंपनीच्या दक्षता पथकाने मुझम्मील इमारतीच्या वीज पुरवठ्याची पाहणी केली असता वीज वितरण कंपनीच्या फ्युज सेक्शन पिलरमधून अनधिकृत केबल जोडून वीज मीटरशिवाय थेट वीज वापरत असल्याचे निष्पन्न झाले. दक्षता पथकाने केलेल्या कारवाईत अनधिकृत वीज जोडणी तोडण्यात आली, अनधिकृत केबल जप्त करण्यात आली असून सुमारे १०,३५४ युनिटचा वापर करून रूपये तीन लाख २९ हजार ३४१ रूपयांची वीज चोरी केल्याचे आढळल्याने वीज चोरीचा गुन्ह नोंदवण्यात आला.