
ठाणे (दि.10 ) शासनाच्या “मिशन 100 डेज्” अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या पुढाकारातून ठाणे प्रांताधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रांताधिकारी उर्मिला पाटील, मीरा भाईंदर अपर तहसिलदार निलेश गौंड, ठाणे तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, नायब तहसिलदार (महसूल) गोरख फडतरे, स्मिता गुरव यांनी उपस्थितांना प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीत शंभर दिवस कृती आढावा व जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत झालेले कामकाज, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची तयारी याबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला तर प्रशिक्षणादरम्यान कार्यालयीन कामकाजात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चॅट जीपीटी, जेमिनी यासारख्या संगणकीय ॲप्लिकेशन्सचा प्रभावी वापर, कर्मयोगी पोर्टलवरील iGot application चा प्रभावी वापर आदी विषयांबाबतचे तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.