
पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने देण्यात येणारी D. LIT ही अत्यंत मानाची पदवी प्रदान करण्यात आली.
रवींद्र प्रभुदेसाई हे गेले अनेक वर्ष उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना रवींद्र प्रभूदेसाई यांनी केवळ ठाणे शहरातीलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत करून या संस्था उभ्या करण्यात मोठं सामाजिक योगदान दिलं आहे.
रवींद्र प्रभूदेसाई यांचं उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने योगदान आहे तसेच अध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं आहे.
रवींद्र प्रभूदेसाईंना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेली डि.लीट ही पदवी म्हणजे ठाणे शहराचा बहुमान आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही.
ठाणे शहराच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या रवींद्र प्रभूदेसाई यांचा डि.लीट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार व्हावा हा विचार पुढे आल्यानंतर ठाणे शहरातील प्रभुदेसाई सरांच्या अनेक हितचिंतकांनी,मित्रांनी एकत्र येऊन नागरी अभिवादन सत्कार समिती स्थापन केली. याच नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी रवींद्र प्रभूदेसाई यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं आहे. गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोज, ठाणे, येथे या जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ, संशोधक, पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आणि अध्यात्माचे उपासक, सुप्रसिद्ध व्याख्याते, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, सनातन संस्थेच्या सद्गुरु, अनुराधाताई वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि ठाणेकर नागरिक उपस्थित राहणार आहेत.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ