
वक्फ बोर्ड विधेयकाबाबत उबाठा गटाची दुटप्पी भूमिका
मुंबई, ता. 2 एप्रिल 2025
निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने समोर आले, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उबाठाची दुटप्पी भूमिका दिसली, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सोयीचे राजकारण करणारे लोक वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबध नाही, असं जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतात ते करतात, हे पाहावे लागेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेने यापूर्वीच स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली आहे. आम्ही कधीही मतांसाठी सोयीचे राजकारण केले नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
काही मुठभर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरिब मुसलमानांसाठी शाळा, रुग्णालये झाली पाहिजेत. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल. या विधेयकाचे मुस्लिम समाजानेही स्वागत करायला हवे. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील छत्रपतींच्या आदर्शावर देशाचे नेतृत्व करत आहेत. इथ औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महायुती सरकार १०० दिवसांत ८५ टक्के कामे पूर्ण करणार
महायुती सरकारने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. २६ विभागांचा आज आढावा घेत असताना अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी ही संकल्पाना गांभीर्याने घेतल्याचे दिसले. यातील ६० टक्के पूर्ण झाली असून २५ टक्के काम प्रगतीपथावर आहेत. १०० दिवसांत ८५ टक्के कामे पूर्ण होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली. १०० दिवसांतील कामांना गती मिळाली आणि संकल्पनेनुसार अधिकारी वर्गाने काम केले. प्रत्येक विभागाची कार्यक्षमता यातून दिसली. मागील अडीच वर्षात महायुती सरकारने जे काम केले त्याच वेगाने आता काम होईल, आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो दुप्पट चौप्पट वेगाने पुढे जाणार असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक
ताज्या बातम्याJuly 1, 2025ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खत निर्मिती सुरू
ताज्या बातम्याJuly 1, 2025हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित