
ठाणे (दि. 01 ) : उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7:00 ते 11:15 वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली तर माध्यमिक शाळांसाठी 7:00 ते 11:45वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी ?
१. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
२. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
३. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.
४. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.
५. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
६. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
७. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे.
८. उन्हात बाहेर जाताना शूज किवा चप्पल घालणे.
९. उन्हात बाहेर पडणे टाळणे.
राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा परिषद शाळाचे वेळ बदल करण्यात आले असून शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ