
ठाणे (दि.01 ) : आर्थिक वर्ष 2024-25 साठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांसाठी डीआयसी एजन्सी – 2 हजार 802 (101.52%) आणि (डीआयसी+केव्हीआयबी)- 3 हजार 273 चे 100% एकूण लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यामध्ये रत्नागिरी (151.46%), रायगड (104.5%), सिंधुदुर्ग (125.83%), पालघर (101%) या चार जिल्ह्यांसाठी 100% पेक्षा जास्त लक्ष्य साध्य केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त कामगिरीद्वारे ठाणे (54.03%) क्षेत्राची तूट भरून काढली आहे.
कोकण विभाग (डीआयसी), रत्नागिरी (जिल्हा), सिंधुदुर्ग (डीआयसी), पालघर (डीआयसी) ने सलग दोन वर्षे 100% लक्ष्य साध्य केले असून रायगड जिल्ह्याने पहिल्यांदाच 100% डीआयसी लक्ष्य साध्य करून इतिहास रचला आहे. तसेच, रत्नागिरीने महाराष्ट्रात सर्वाधिक एमएम दावे (83%) सादर केले आहेत आणि महाराष्ट्रात एमएम वितरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या कामगिरीकरिता कोकण विभाग उद्योग सहसंचालक कार्यालय, सर्व महाव्यवस्थापक, सर्व उद्योग अधिकारी/उद्योग निरीक्षक, सर्व एलडीएम आणि सर्व बँक अधिकारी, सर्व 5 जिल्ह्यांचे एमसीईडी/मिटकॉन अधिकारी आणि त्यांच्या टीमचे 100% पेक्षा जास्त लक्ष्य साध्य केल्याबद्दल तसेच, 54% लक्ष्य साध्य केल्याबद्दल ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे, व्यवस्थापक, उद्योग निरीक्षक आणि त्यांच्या टीमचे कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी अभिनंदन केले आहे.