
ठाणे (दि.08) : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मि. मि व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅस च्या कामांमध्ये शनिवार, 6 डिसेंबररोजी सकाळी नादुरुस्त झाली आहे.
पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मागील दोन दिवसापासून सुरू आहे परंतु जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी आणखी तीन दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणास्तव ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये 30 टक्के पाणी करण्यात लागू करण्यात येत आहे.
शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी दिनांक 11/12/2025 पर्यंत झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.