आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनचे सदस्य, ठाणेकर ५२ वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवर नवा विक्रम रचणार आहेत. ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. खांडेकर हे बालपणापासूनच सायकल प्रेमी आहेत. त्यांनी देश-विदेशात आतापर्यंत 60000 हून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केलेला आहे. कोरोना काळात लॉक डाऊन मुळे त्यांचा अर्धवट राहिलेला सायकल प्रवास ते पुन्हा नव्याने करून एक नवा विक्रम रचणार आहेत.
हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत आणि अर्जेंटिनाला पोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवर प्रवास सुरू होणार आहे. यादरम्यान ते 17 देश कव्हर करणार आहेत अशी माहिती खांडेकर दिली. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ते जेवणाचे, निवासाचे साहित्य देखील सोबत नेणार आहेत. आणि स्वतः प्रवासादरम्यान जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत. या प्रवासादरम्यान ते फिट रहा हित रहा, त्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. हा खांडेकर यांचा प्रवास नऊ महिन्यांचा आहे. आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्या सहकार्याने खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी तशी त्यांची मानसिक तयारी देखील केली आहे. या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, सदस्य अजय भोसले, सदस्य गुरुप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.
खांडेकर यांनी 23 किलो वजनाची पुशिंग सायकल स्वतः तयार केली आहे. ही सायकल एका पायाने ढकलावी लागते अशाप्रकारे त्यांनी या सायकलवर साडेतीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला आहे
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक
ताज्या बातम्याJuly 1, 2025ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खत निर्मिती सुरू
ताज्या बातम्याJuly 1, 2025हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित