ठाणे, दि.17 : हावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना करिअरचे वेध लागतात. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे निश्चित झाल्यानंतर विद्यार्थी त्या शाखेचे शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात. इतर शाखांबरोबरच विद्यार्थ्यांना आयटीआय केल्यानंतरही नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तसेच आयटीआय झालेला विद्यार्थी स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतो.
एखाद्या तरुणाने योग्य वयात आयटीआय केले तर तो शिक्षण पूर्ण होताच कुशल होतो. कौशल्य आत्मसात करणे हा तरुणांसाठी योग्यवेळी घेतलेला योग्य निर्णय ठरू शकतो. शासकीय महाविद्यालयाबरोबरच अनेक संस्थाही विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण घेण्याचा आग्रह धरतात. आयटीआय केल्यानंतर रोजगाराच्या अफाट संधी निर्माण होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडेही डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. 15मे 2025 पासून ऑनलाईन अर्ज विद्यार्थी करीत आहेत, ऑनलाईन अर्ज दि.26 जून, 2025 पर्यंत करता येईल. प्रवेशासंबंधीचे नियम, आवश्यक कागदपत्रांची माहिती व प्रवेश कार्यपद्धती पुस्तिका https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ठाणे जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था-10, तर खाजगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था-07 कार्यरत असून प्रशिक्षणासाठी विविध व्यवसाय (ट्रेड्स) अभ्यासक्रमांमध्ये 3 हजार 136 जागा उपलब्ध आहेत.
आयटीआय नंतर रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी :- आयटीआय झालेल्या विद्यार्थ्याला रेल्वे, सैन्यदल, बांधकाम, पाटबंधारे विभाग, तंत्रशिक्षण विभाग अशा सरकारी नोकऱ्यांची संधीही मिळू शकते. या विभागांकडून वेळोवेळी आयटीआय पदविकाधारकांसाठी नोकऱ्या काढल्या जातात. तसेच आयटीआय केल्यानंतर तरुणांना परदेशातही रोजगाराच्या संधी उपलब्ध, त्याच प्रमाणे ऑटो क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात काम करण्याचा मार्गही सहज मिळू शकतो.
याशिवाय घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणाऱ्या कंपन्याही तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना प्राधान्य देतात. स्वत:चे लघु उद्योग निर्माण करु शकतात.
आयटीआयचे प्रशिक्षण घेतल्यानंतर संधीचे अनेक दरवाजे उघडतात. अभियांत्रिकी आणि सेवा उद्योगांमध्ये थेट रोजगार मिळवणे, उच्च शिक्षण घेणे किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु करता येतो. विद्यार्थ्यांनी आयटीआय मध्ये प्रवेश घेऊन कौशल्य आत्मसात करावे.
आयटीआय नंतर रोजगाराच्या भरपूर संधी :- आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक जगात, व्यवसायिक प्रशिक्षणाचे महत्व अनमोल आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली व्यवहारिक कौशल्य (OJT) आणि ज्ञान देऊन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
प्रवेश प्रक्रिया व इतर महितीसाठी उमेदवार / पालक यांनी आपल्या लगतच्या आयटीआय मध्ये तात्काळ भेट द्यावी. अधिकची माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. सदाफुले यांनी केले आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक
ताज्या बातम्याJuly 1, 2025ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खत निर्मिती सुरू
ताज्या बातम्याJuly 1, 2025हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित