
ठाणे (15) : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर येथे नागलाबंदर खाडी किनारा विकसित करणे शासनाच्या निधीअंतर्गत आरमार केंद्र प्रतिकृतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर नागलाबंदर खाडी किनारी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले वाणिज्य गाळे, निवासी घरे तसेच टपऱ्या आदी पूर्णपणे निष्कसित करण्याची कारवाई महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आज अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली.
सदरची कारवाई प्रस्तावित करण्यापूर्वी या ठिकाणी अनधिकृतपणे निवासी घरात वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन भाईंदरपाडा येथील महापालिकेच्या सदनिकेमध्ये करण्यात आले. तसेच या ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे संपूर्णपणे निष्कसित करण्याची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई उपायुक्त शंकर पाटोळे, माजिवडा मानपाडा प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे, कार्यकारी अभियंता महेश अमृतकर, एमएसएफचे जवान व पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
