
ठाणे : यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ मे ते १२ मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे १८ वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आ. संजय केळकर यांच्यासमवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष साळुंखे, विष्णू रानडे उपस्थित होते.
Please Share and like us: