
ठाणे (२३) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, कटाई नाका ते ठाणे या दरम्यान गुरूवार दि. २४ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून ते शुक्रवार दि. २५ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळून) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरू नगर तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.
तसेच, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ