
दहशतवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून या प्रत्यार्थ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत , अशी माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अतिशय कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यादृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा स्वतः लक्ष घालत असून त्यांना त्यात यश मिळेल. या घटनेत पर्यटकांना मारताना ते मुसलमान नाहीत याची खात्री करून मारण्यात आले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा करेल तितका निषेध कमीच आहे.
या हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सामील असून अशा प्रसंगी आमचे व्यक्तिगत आनंदी कार्यक्रम बाजूला ठेवून या कुटुंबावर ओढावलेल्या दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी ईश्वर त्यांना धैर्य आणि शक्ती प्रदान करो, अशी आम्ही प्रार्थना करीत आहोत.