
कोपरी येथील हॉटेल अयुग समोर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या ठिकाणी सीएनजी पंप पुढे सर्विस रोड वरती OLECTRA कंपनीचा बेस्ट बस ए७०० MH ०१ EM ९२२६ (चालक:- सुशांत मोहिते, वाहक: . महाले, मार्ग:- बोरिवली स्टेशन ते ठाणे स्टेशन पूर्व) या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सदर बस रस्ता दुभाजकावर चढून अपघात झाला.
सदर घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, बेस्ट विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ओलेक्ट्रा कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह उपस्थित
सदर घटनास्थळी बस मध्ये अंदाजे ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४ ते ५ प्रवाशांना दुखापत झाली होती सदर सर्व प्रवासी स्वतः बस मधून उतरून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले आहेत व दोन व्यक्तींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे