
ठाणे (03) : नवीन पिढी सक्षम करण्यासाठी पालकत्वही तितकेच सक्षम असणे आवश्यक असते, आहे, गरोदरमातांनी केलेल्या विचारांचा परिणाम हा बाळावर होत असतो. यासाठी गर्भवती मातांनी रोज आपल्या बाळाशी संवाद साधावा, आपल्या बाळाला समजत आहे या भावनेने त्याच्याशी बोलत रहावे याचे कळत नकळत परिणाम हे गर्भातील बाळावर होत असल्याचे मनशक्ती केंद्र, लोणावळा येथील जीवनदानी साधक सुहास गुधाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नमूद केले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिका आयोजित मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा प्रस्तुत 'गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार' या विषयावरील मार्गदर्शन कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आज आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपवैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताली वाघमारे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे, मनशक्ती प्रयोग केंद्राचे साधक मनोज पाटील, सुधाकर पाठक, जयप्रकाश वराडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास ठाणे महापालिकेतील विविध आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार याविषयी मार्गदर्शन करताना वक्ते सुहास गुधाटे यांनी वैज्ञानिक गर्भसंस्कारामध्ये गर्भावस्थेदरम्यान आई आणि तिच्या बाळाच्या शारिरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या आधारित मार्गदर्शन आणि उपायांचा समावेश असतो, या उपायांमुळे बाळाचा उत्तम विकास आणि आईचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. आईमध्ये असलेल्या गुणांचा बाळामधील गुणांमध्ये गुणाकार होवून गुण कसे वाढतील आणि दोष कसे कमी यासाठी गरोदर मातांनी प्रयत्न करावेत. गर्भधारणा ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल मनात कुठलेही भय ठेवू नये. प्रसुती नैसर्गिक होण्यासाठी गरोदर मातांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक प्रसुती होईल अशी भावना मनात ठेवावी यासाठी हलकी आसने करावीत. गर्भातील बाळ हे अनेक गोष्टींना प्रतिसाद देत असते, यासाठी गर्भवती मातांनी चांगले संगीत ऐकावे, त्याचा थेट परिणाम हा बाळावर होत असतो. संगीतामुळे बाळाच्या उजव्या मेंदूला चालना मिळते, दोन्ही मेंदूचा समतोल राखल जातो. तसेच संगीत ऐकल्याने आईच्या मनावरचा ताण, चिंता आणि नैराश्य देखील कमी होण्यास मदत होते.
गर्भवती मातांच्या घरातील वातावरण देखील चांगले असणे गरजेचे आहे. भय, राग, धैर्य, शांती हे स्वभावाचे प्रकार आहेत. भय आणि राग हे अंगभूत असतात त्यावर नियंत्रण ठेवावे असेही सुहास गुधाटे यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स, प्रसाविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Please Share and like us:
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ