# दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत नळ जोडण्याविरोधातील कारवाई सुरूच

ठाणे (दि.3 ) : दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या दुसऱ्या दिवशी 27 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पहिल्या दिवशी 29 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच अनधिकृत नळ जोडणीबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिवा आणि मुंब्रा या भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करणे, अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र काढणे यासाठी विभागनिहाय टीम तयार केल्या आहेत. त्यांनी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कल्याण फाटा ते वाय जंक्शन या भागातील 14 अनधिकृत व्यावसायिक (दुकाने, टप्-या) नळ जोडण्या खंडित केल्या. तर 10 घरगुती अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. वाय जंक्शन ते मुंब्रा- ग्लोबल नाला आणि आगासन गाव येथे 13 निवासी अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. आगासन गाव येथे 6 नळजोडण्या तर 4 टँकर पॉईट उध्दवस्त करुन 6 पंप जप्त करण्यात आले. त्याचबरोबर, तीन अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र उद्धस्त करण्यात आले. या कारवाईत पाच पंप जप्त करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.



महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई करण्यात येत आहे.
: ठाणे रेडिओ
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ