
ठाणे – आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पालघर जिल्ह्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. काँग्रेस पक्षाने ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांची प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पपदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार अॅड. विक्रांत चव्हाण यांची पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी तशा आशयाचे नियुक्तीपत्र अॅड. विक्रांत चव्हाण यांना दिले असून आपण पालघर जिल्ह्यात जाऊन सर्व ब्लॉक अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या ब्लॉकनिहाय बैठका घ्याव्यात व आपला अहवाल 15 दिवसांत प्रदेश कार्यालयाला सादर करावा असे निर्देशित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांना सुद्धा या नियुक्तीबाबत पत्र पाठवून पालघर जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी निरीक्षकअॅड. विक्रांत चव्हाण हे चर्चा करतील. या संदर्भात ब्लॉकनिहाय बैठकांचे आयोजन करणे अपेक्षित आहे असे म्हटले आहे.