अर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार 1 एप्रिल 2025 पासून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात. हा पुरस्कार दरवर्षी देशभरातील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना (वय वर्षे 5 ते 18) सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो.
शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कला व संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारासाठी कोणतेही भारतीय नागरिकत्व असलेले व भारतात वास्तव्यास असलेले 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुले पात्र आहेत. अर्जदार स्वतः अर्ज करू शकतात तसेच इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेद्वारे त्यांचे नाव नामांकनासाठी सुचवले जाऊ शकते. केंद्रीय मंत्रालयानी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 ठेवली आहे. अधिक माहितीसाठी (https://awards.gov.in) या वेबसाइटला भेट द्यावी.
दरवर्षी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे या पुरस्कारांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विविध क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना गौरविण्यात येते.
#Thane Radio
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ
ताज्या बातम्याJuly 2, 2025अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक