

टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे (दि.25) : इ. स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञाच्या परिषदेत मांडला व त्यास दि.24 मार्च रोजी मान्यता मिळवली म्हणून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दुरीकरणाकरिता विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे कार्यालय अंतर्गत दि.24 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणुन निवड करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या निर्देशांकानुसार व सहसंचालक आरोग्य सेवा, क्षय व कुष्ठ पुणे यांचे मार्गदर्शक तत्वानुसार एकूण 28 रोप्य प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा पुतळा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच 12 निक्षय मित्र व 4 टीबी चॅम्पीयन यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीमधील 28 कास्य व 136 रोप्य मानांकन देऊन पुढील वर्षी उर्वरित सर्व ग्रामपंचायती ह्या लवकरच सिल्वर मधून सुवर्ण नामांकन प्राप्त करण्यास प्रयत्न करून ठाणे जिल्ह्यात क्षयरोग हद्दपार करूयात, असे आवाहन केले.
कार्यक्रम हा जिल्हा क्षयरोग केंद्र कार्यालय व जी. एल. आर. ए. इंडिया (जर्मन लेप्रसी एन्ड टीबी रिलीफ असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये एन. के. टी. माध्यमिक ज्युनिअर महाविद्यालयातील 250 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच नर्सिंग टी एन. के. टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीबी विषयक चित्रकला, रांगोळीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच टीबी जनजागृती करिता पथनाट्य नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या समोर सादर केला.

जागतिक क्षयरोग दिन नियोजन भवन सभागृह येथे संपन्न झाला असून नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींची क्षयरोग विषयी विविध जनजागृती रॅली आयोजित करून विद्यार्थी रॅली, पथनाट्य, ऑटो मायकिंग, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर असे विविध उमक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरु करण्यात आले असून कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आशा मुंजाळ यांनी केली.
केंद्र शासनाच्या टीबी मुक्त ग्रामपंचायत निर्देशांकानुसार निवड झालेल्या ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. अशोक नांदापूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, नगराध्यक्ष सुमती पाटील, नगरसेवक किरण भोईर, संत क्लरेट आश्रम बेंडशीळ ता.अंबरनाथ रामभाऊ पातकर, नगराध्यक्ष बदलापुर व निक्षय मित्र, तालुका आरोग्य अधिकारी सर्व, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, निक्षय मित्र, टीबी चॅम्पीयन तसेच कार्यक्षेत्रातील सर्व क्षयरोग कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी केले.
