Please Share and like us:
Voice of Thane |
ठाणे (दि.25) : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास प्रतिबंध बसावा, तसेच कापडी पिशवीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्यातर्फे नौपाड्यातील गावदेवी मार्केट येथे कापडी पिशव्यांचे दोन व्हेंडींग मशीन बसवण्यात आले आहे. मशीनमध्ये 10 रुपये टाकल्यावर ग्राहकांना त्यातून कापडी पिशवी मिळणार आहे.
गावदेवी मार्केटमधील कापडी पिशव्यांच्या या मशीन्सचे उद्घाटन सोमवारी सकाळी ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आणि डिस्ट्रिक्ट 3124 चे प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, सचिव अमोल नाले, जिल्हा सचिव संतोष भिडे आदी उपस्थित होते. रोटरी क्लबच्या मदतीने आणखी काही मार्केटमध्ये अशाप्रकारचे कापडी पिशवीचे व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार असल्याचे मनीषा प्रधान यांनी सांगितले.
: ठाणे रेडिओ