नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026 | देशात 2026 मध्ये नैऋत्य मोसमी हंगामी (जून ते सप्टेंबर) पाऊस सामान्यपेक्षा कमी (दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 90-95%) राहण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय हवामान विभाग 2003 पासून देशातल्या सरासरी नैऋत्य मोसमी हंगामी (जून-सप्टेंबर) पावसाचा कार्यात्मक दीर्घकालीन अंदाज दोन टप्प्यांत जारी करत आहे. पहिला अंदाज एप्रिलमध्ये दिला जातो आणि दुसरा किंवा अद्ययावत अंदाज मे महिन्याच्या अखेरीस दिला जातो.
1. देशात 2026 मधल्या नैऋत्य मोसमी हंगामातल्या (जून-सप्टेंबर) पावसाचा अंदाज
बदलत्या आणि सांख्यिकीय अशा दोन्ही मॉडेल्सवर आधारित अंदाजानुसार, परिमाणवाचकदृष्ट्या मान्सूनचा हंगामी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहण्याची शक्यता आहे, यामध्ये ± 5% मॉडेल त्रुटी असू शकते. 1971-2020 या कालावधीसाठी देशात हंगामी पावसाची दीर्घकालीन सरासरी 87 सेमी आहे.
‘सामान्यपेक्षा जास्त’ आणि ‘अत्यधिक’ पावसाच्या श्रेणीची शक्यता त्यांच्या संबंधित हवामानशास्त्रीय संभाव्यतेपेक्षा कमी आहे. एकूणच, देशात नैऋत्य मान्सूनचा हंगामी पाऊस सामान्यपेक्षा कमी (एलपीएच्या 90–95%) राहण्याची दाट शक्यता आहे.
निक वितरणानुसार, ईशान्य, वायव्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर देशाच्या अनेक भागांत सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस पडण्याची शक्यता आहे.