
ठाणे, दि. 20 (प्रतिनिधी) : `क्रेडाई-एमसीएचआय’तर्फे बाळकूम येथील दोस्ती वेस्टकाऊंटी मध्ये सुरू असलेल्या २३व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप झाला. गेल्या तीन दिवसांत प्रदर्शनाला ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्हा व मुंबई उपनगरातील 20 हजार 467 नागरिकांनी भेट दिली असून, २३४ नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी केली. या प्रदर्शनात ३९८ कोटी रुपयांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रतिसादाबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी आणि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.
या प्रदर्शनात ठाण्यातील ४०हूनअधिक आघाडीच्या विकसकांचे १००हून अधिक रेरा-मान्यताप्राप्त गृहप्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यात ५५ लाख रुपयांच्या १बीएचकेपासून प्रीमियम दर्जाच्या ४बीएचके प्रशस्त निवासस्थानांचा समावेश होता. या प्रदर्शनात घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माजिवडा येथील मालमत्तांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या मालमत्तेत ही ग्राहकांनी औत्सूक्य दाखविले. किमान ५५ लाख ते २ कोटी २५ लाखांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आढळली. काही वैशिष्ट्य पूर्ण ऑफर्समुळे अनेक ग्राहकांनी घरांची थेट नोंदणी केली. या प्रदर्शनात स्टेट बँक, यूनियन बँकेसह काही बँका व वित्त संस्थांची दालने होती. त्यात अनेक ग्राहकांच्या कर्ज पुरवठ्यावरी अर्जावर तातडीने प्रक्रिया सुरू करण्यात आली.
घर खरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदाच प्रदर्शनात आलेल्या अनेक कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न साकार झाले.