
ठाणे, दि. 4 : बंगाल व आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपासह `एनडीए’चा दणदणीत विजय झाल्याबद्दल, भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी बँड वाजवून विजयोत्सव जल्लोषात साजरा केला. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई व कोकम सरबत वाटून आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाने देशभर राबविलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला. बंगाल व आसाममधील जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केला. तसेच बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात केली, अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली.

रेल्वे स्टेशनबाहेर झालेल्या या विजयोत्सवाला ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह माजी सरचिटणीस, मनोहर सुगदरे, विकास घांगरेकर, महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले, प्रशांत कळंबटे, श्रीकर परांजपे, संजय रानडे, राजेश ठाकरे, शरीफ शेख, हनीफ खान, मनोज शुक्ला, जगदीश मोहिते, ज्ञानेश्वर आंदुरे, सई कारुळकर, वैशाली विधाते, रंजना भंडारे, राणी क्षीरसागर, कविता यादव यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते