
“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे ते एक प्रभावी माध्यम असले पाहिजे,” या उच्च विचारांना प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे *महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक* यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी अत्यंत पोटतिडकीने दाखवून दिली आहे.
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये शेतकरी आणि त्यांचे कुटुंब निसर्गाच्या लहरीपणावर आणि भीषण पाणीटंचाईवर मात करत दिवसरात्र राबत आहेत. अशा कठीण प्रसंगी जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या घरी सणासुदीच्या आनंदात कुठलीही उणीव भासू नये, म्हणून मंत्री सरनाईक यांनी ऐतिहासिक आणि लक्षवेधी पाऊल उचलले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २ लाखांहून अधिक दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची यंदाची दिवाळी गोड आणि आनंदाची होणार आहे.

*स्वतः मंत्र्यांकडून पाहणी; “मी जे बोलतो, ते करून दाखवतो!”*
या विशेष उपक्रमाच्या तयारीचा आणि वितरणाचा आढावा घेण्यासाठी आज, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्ष उपक्रमाच्या तयारी स्थळाची पाहणी केली. प्रत्येक साहित्य व्यवस्थित पॅक होत आहे की नाही, गरजवंतांपर्यंत ती वेळेत पोहोचेल का, याची पाहणी करत त्यांनी संपूर्ण यंत्रणेला कडक निर्देश दिले.

#काय असणार आहे या विशेष ‘दिवाळी भेटी’मध्ये?
ठाणे-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्य नगर येथे महिला बचत गटांच्या हजारो महिलांनी एकत्र येऊन या उपक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. महिला सक्षमीकरणाचा हा अनोखा संगम साधत तयार करण्यात आलेल्या या दिवाळी भेटीमध्ये एकूण दहा महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे:
* १ किलो रवा
* १ किलो साखर
* १ किलो वनस्पती घी
* १ किलो मैदा
* १ किलो बेसन
* सुगंधित उटणे
* लक्ष्मीची पावले
* नवीन वर्षाची दिनदर्शिका (कॅलेंडर)
* सणाची पणती
* आवश्यक शिधा व सणासुदीच्या इतर वस्तू.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही भेट धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरात आदराने पोहोचवली जाईल. या कामात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी सर्व शिवसैनिकांना युद्धपातळीवर कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

# लोककल्याणकारी राजकारणाचा नवा आदर्श
मागील वर्षीही धाराशिवमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गाईंचे वाटप करून त्यांना आर्थिक स्थैर्याचा आधार देणारे मंत्री सरनाईक यंदा देखील दिवाळीची थेट प्रत्येकाच्या घरी पोहोचवणार आहेत. केवळ ओवळा-माजिवडा (मतदारसंघ क्र. १४६) आणि मिरा-भाईंदर (मतदारसंघ क्र. १४५) या मतदारसंघांतीलच नव्हे, तर धाराशिवच्या कानाकोपऱ्यातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
संकटाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला केवळ धीर देण्याचे काम न करता, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत असून, एका संवेदनशील नेत्याचा परिपूर्ण चेहरा यानिमित्ताने पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे.
या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणतात की, “राजकारणात घोषणा अनेकजण करतात, पण संकटसमयी धावून जाणारा खरा नेता तोच असतो जो शब्दाला जागतो! मी जे बोलतो, ते करून दाखवतो. माझ्या धाराशिवमधील बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हेच माझे आद्य कर्तव्य आहे. विरोधक केवळ भाषणे करतात, आम्ही थेट कृतीतून शेतकऱ्यांच्या दारात दिवाळी पोहोचवतो! हा केवळ मदतीचा हात नाही, तर संकटकाळात संपूर्ण महाराष्ट्र आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हा विश्वास देण्याचा प्रयत्न आहे.”