
ठाण्यात रंगणार 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 5 दिवसीय ‘दशावतार नाट्य महोत्सव 2026
ठाणे: शेती, पर्यटन,मत्स निसर्ग भाषा लोकसंस्कृती आणि लोककला अश्या अनेक क्षेत्रात जगात सुंदर असणारे कोकण जागतिक कीर्तीचे व्हावं यासाठी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य , ॲड. आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री ,श्रीराम पांडे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, व डॉ. किरण कुलकर्णी सचिव कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघात प्रभाग क्र 14 मध्ये दि.25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026,सलग 5 दिवसाचा दशावतार नाट्य महोत्सव 2026 दररोज सायं 6:30 ते रात्री 10:00 या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर नगर मधील सचिन तेंडुलकर स्टेडियम,महात्मा फुले नगर येथे होत आहे.
या “दशावतार नाट्य महोत्सवाचे उदघाटन उत्साहात झाले.प्रभाग क्र १४ चे ठाणे महानगर पालिका स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून, दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी अनिल भोर नगरसेवक, दशरथ पालांडे माजी नगरसेवक ,दत्ता परब , संजय गावडे , देवेंद्र नाईक ,बाळकृष्ण परब बुवा, आशिष गावडे , सुहास चव्हाण आणि राजेश म्हापणकर आदी मान्यवर उपस्थित होते, श्री कलेश्वर दशावदार नाट्य मंडळ यांच्या गोमय गणेश नाट्यप्रयोगाने महोत्सवाची सुरवात झाली.

प्रास्ताविक मनोगत श्रीराम पांडे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे यांनी केले .पांडे यांनी म्हटले या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोकणातील विविध दशावतार मंडळांचे सादरीकरण करणारे १०० हून अधिक कलाकार एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, खानोलकर पारंपरिक दशावतार मंडळ, खानोली आणि सिध्दीविनायक दशावतार नाट्य मंडळ, डोंबिवली यांसारख्या पारंपरिक लोककलांचे जिवंत दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. ठाणेकर नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम पांडे यांनी केलेले आहे.
कार्यक्रमाची सांगता सई खानोलकर आणि महेश नाईक बुवा यांच्याहस्ते श्री कलेश्वर दशावदार नाट्यमंडळाला सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आले या कार्यक्रमाचे अप्रतिम निवेदन योगेश कांबळी यांनी केले