
ठाणे (28) : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनी मधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर संपची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 30/01/2026 रोजी सकाळी 9.00 पासून दुपारी 3.00 वाजेपर्यत् 06 तासांचा स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. परिणामी, सदर दिवशी मे. स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झोनिंग करुन सुरु ठेवण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 30/01/2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समतानगर, सिध्देश्वर, इटर्निटी, जॉन्सन, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, रुपादेवी पाडा, किसननगर इत्यादी भागात 06 तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व महापा लिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.